आयसीसीने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचं नवं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यात भारत-पाकिस्तान सामन्यासह एकूण नऊ सामन्यांच्या वेळापत्रकात बदल झाला आहे.

5 ऑक्टोबरपासून विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेची तिकिटं कधी मिळणार आहेत याची घोषणाही आयसीसीने केली आहे.

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार 15 ऑगस्टपासून तिकिटांची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु होईल. त्यानंतर 25 ऑगस्टपासून तिकिटांची विक्री सुरु होईल.

म्हणजेच क्रिकेटप्रेमींना 15 ऑगस्टपासून किती तिकिटं हवीत याचं रजिस्ट्रेशन करावं लागेल. यासाठी www.cricketworldcup.com/register या जावं लागणार आहे.

आयसीसीच्या अधिकृक वेबसाईट शिवाय ऑफिशियल टिकिटिंग पार्टनर्सच्या वेबसाईटवर तिकिटं बूक करता येणार आहेत.

तिकिट विक्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे 25 ऑगस्टला टीम इंडियासोडून इतर संघाच्या सामन्यांची तिकिटं मिळणार आहेत.

भारतीय क्रिकेट संघाच्या सामन्यांची तिकिटं हीव असल्यास थोडं थांबावं लागणार आहे. 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान टीम इंडियाच्या सामन्यांची तिकिटं मिळणार आहेत.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान सामन्याची तिकिटं 3 सप्टेंबरला उपलब्ध होणार आहेत.

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या उपान्त्य फेरी आणि अंतिम फेरीच्या सामन्यांची तिकिटं 15 सप्टेंबरला खरेदी करता येणार आहेत.

विश्वचषक स्पर्धेत 10 संघांचा समावेश असून 45 सामने खेळवले जाणार आहेत. दोन्ही ग्रुपमधले चार संघ उपान्त्यफेरीत दाखल होतील. 15 आणि 16 नोव्हेंबरला उपान्त्य फेरीचे सामने रंगतील

VIEW ALL

Read Next Story