भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा जहीर खानचा विक्रम श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात मोडीत काढला आहे.

अर्धा संघ 18 धावांवर तंबूत धाडला

शमीने श्रीलंकेविरुद्ध गुरुवारी झालेल्या वर्ल्ड कप 2023 च्या 33 व्या सामन्यामध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पाहुण्यांचा अर्धा संघ 18 धावांवर तंबूत धाडला.

विक्रम रचला

केवळ 3 सामन्यांमध्ये शामीने 14 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 5 आणि इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 4 विकेट्स घेतल्यानंतर श्रीलंकेविरुद्धही 5 विकेट्स घेत विक्रम रचला.

खासगी आयुष्यात गोंधळ

मोहम्मद शमीचं खासगी आयुष्य फार गुंतागुंतीचं आहे. पत्नी हसीन जहाँबरोबर त्याचा घटस्फोट झाला आहे. या दरम्यान दोघांमध्ये बरेच आरोप प्रत्यारोप झाले.

देशद्रोहाचा आरोप

यावेळेस शमीवर हसीन जहाँने गंभीर आरोप करताना अगदी देशद्रोहाचाही आरोप केला. देशाबरोबर शमीने गद्दारी केल्याचं ती म्हणाली होती.

शमीने स्पष्ट उत्तर दिलेलं

एका मुलाखतीमध्ये शमीला देशद्रोहाच्या आरोपांसंदर्भात विचारण्यात आलं होतं. त्यावर त्याने स्पष्ट शब्दात उत्तर दिलेलं.

देशाला फसवण्याचा विचार आला तर...

आताच नाही तर कधीही माझ्या मनात देशाला फसवण्याचा विचार आला तर त्यापेक्षा मी मरण पत्करेल, असं शमी म्हणाला.

मी मरणं पसंत करेन

देशाला धोका देण्यापेक्षा मी मरणं पसंत करेन, असं शमी म्हणाला होता.

अनेकांनी शमीच्या विक्रमानंतर शेअर केला व्हिडीओ

शमीने वर्ल्ड कपमध्ये विक्रमी कामगिरी केल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

कोणावरच विश्वास ठेवणार नाही

शमी या बॅड पॅचमधून सावरला असला तरी आता आपण पुन्हा कोणत्याच मुलीवर विश्वास ठेवणार नाही असंही त्याने या मुलाखतीत म्हटलं आहे.

VIEW ALL

Read Next Story