शाहरुख खान ने यंदा 58 वाढदिवस साजरी केला आहे .वाढदिवसा निमित्त सुपरस्टारने काल रात्री मुंबईत कुटुंब आणि मित्रांसोबत वाढदिवसाची पार्टी देखील साजरी केली.

विशेष म्हणजे त्याची मेनेजर पूजा ददलानीचा हिचा वाढदिवस ही एकाच दिवशी येतो म्हणून ते दर वर्षी सोबत साजरी करतात.

गेस्ट लिस्ट मध्ये दीपिका, रणवीर सिंग, आलिया भट्ट आणि शाहीन भट्ट , एमएस धोनी आणि जवान दिग्दर्शक ऍटली यांचा समावेश होता.

तर अभिनेत्यांनी भव्य पार्टीचे फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले. आणि यामध्ये निर्माती फौजिया अदील बट जी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीजवर शेअर केलेल्या फोटोमुळे खूप चर्चित होती.

पठाण, ओम शांती ओम, हॅप्पी न्यू इयर, चेन्नई एक्सप्रेस आणि जवान या चित्रपटांमध्ये शाहरुखसोबत काम केलेल्या दीपिकाने पती रणवीर सिंगसोबत पार्टीला हजेरी लावली.

डिअर जिंदगीमध्ये शाहरुखसोबत काम केलेल्या आलियाही बहीण शाहीनसोबत वाढदिवसाच्या पार्टीला आली होती.

करीना कपूरने शाहरुखच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो देखील शेअर केले होते.

शाहरुखने आपला वाढदिवस मुंबईत चाहत्यांसोबत ही साजरा केला. तर यंदा शाहरुख खानसाठी हे वर्ष उत्कृष्ट ठरले आहे. 2023 मध्ये तो धमाकेदार चित्रपटांसोबत परतला आहे पठान आणि जवान चित्रपट बॉक्सऑफिसवर खूप गाजले आहेत.

VIEW ALL

Read Next Story