मिशन वर्ल्ड कप

ICC एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक आज मुंबईत एका कार्यक्रमात जाहीर करण्यात आलं. यानुसार टीम इंडियाचं मिशन वर्ल्ड कप आठ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया 42 दिवसात 9 सामने खेळणार असून 9 वेगवेगळ्या मैदानावर हे सामने रंगणार आहेत.

पहिला सामना - चेन्नई

टीम इंडियाचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईच्या स्टेडिअमवर रंगणार आहे. या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलियात तीन एकदिवसीय सामने खेळले गेलेत. यात एक विजय आणि दोन पराभवांचा सामना करावा लागलाय.

दुसरी सामना - दिल्ली

भारताचा दुसरा सामना 11 ऑक्टोबरला अफगाणिस्तानविरुद्ध खेळला जाणार आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर टीम इंडिया आतापर्यंत 21 एकदिवसीय सामने खेळली असून 13 विजय आणि 7 पराभव नावावर आहेत.

तिसरा सामना - अहमदाबाद

15 ऑक्टोबरला टीम इंडिया आणि पाकिस्तानदरम्यान अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हाय व्होल्टेज सामना रंगेल. मोदी स्टेडिअमवर भारताने 18 सामन्यांपैकी 10 सामन्यात विजय आणि 8 सामन्यात पराभव स्विकारला आहे.

चौथा सामना - पुणे

मिशन वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीम चौथा सामना बांगलादेशविरुद्ध खेळेल. 19 ऑस्टोबरला पुण्यात हा सामना होईल. पुण्यातल्या मैदानावर टीम इंडिया 7 वन डे खेळली असून 4 विजय तर 3 पराभव नावावर आहेत.

पाचवा सामना - धरमशाला

पाचव्या सामन्यात टीम इंडिया 22 ऑक्टोबरला बलाढ्य न्यूझीलंडशी दोन हात करेल. या मैदानावर टीम इंडिया 4 वन डे खेळली असन 2 विजय आणि 2 पराभव नावावर आहेत.

साहवा सामना- लखनऊ

29 ऑक्टोबरला लखनऊमध्ये टीम इंडिया आणि इंग्लंड आमने सामने असतील. या मैदानावर एकमेकांविरुद्ध पहिल्यांदाच दोन्ही संघ खेळणार आहेत. टीम इंडिया या मैदानावर केवळ एक सामना खेळली आहे. आणि त्यातही पराभव स्विकारावा लागला आहे.

सातवा सामना - मुंबई

क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या मुंबईच्या वानखेडे मैदानावर 2 नोव्हेंबरला टीम इंडिया उतरेल. क्वालीफाय राऊंडमधून जो संघ विश्व चषकात पात्र ठरेल त्या संघाविरुद्ध भारतीय संघाचा सामना होणार आहे. मुंबईत टीम इंडिया 20 वन डे खेळली असून 11 विजय आणि 9 पराभव स्विकारलेत.

आठवा सामना - कोलकाता

5 नोव्हेंबरला टीम इंडिया कोलकातात दक्षिण आफ्रिकेला भिडेल. ईडन गार्डनवर टीम इंडिया 22 एकदिवसीय सामने खेळली असून यात 13 सामन्यात विजय आणि 8 पराभव स्विकारावे लागले आहेत. तर एका सामन्याचा निकाल लागलेला नाही.

नववा सामना - बंगळुरु

11 नोव्हेंबरला टीम इंडिया क्वालिफाय करणाऱ्या दुसऱ्या संघाशी भिडेल हा सामना बंगळुरुत होईल. एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर भारत आतापर्यंत 21 सामने खेळलाय. यात 14 विजय आणइ 5 पराभवांचा समावेश आहे. 2 सामन्यांचा निकाल लागला नाही.

VIEW ALL

Read Next Story