वय फक्त आकडा असतो, असं म्हटलं जातं. याचा प्रत्यय तुम्हाला ऑस्ट्रेलिया ओपन जिंकणाऱ्या रोहन बोपन्ना याकडे पाहिल्यावर आला असेल.
रोहन बोपन्नाने नवा इतिहास रचला. ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून तो पुरूष दुहेरीचे ग्रँडस्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरला आहे.
काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना त्याने आपल्या फिटनेसचं रहस्य सांगितलं होतं. आपल्या फिटनेससाठी अयंग्गर योगा उपयोगीचा ठरला असं रोहन सांगतो.
अयंग्गर योगामुळे मी इतकी वर्ष टेनिस कोर्टावर टिकून आहे. मी माझ्या फिजिओला तक्रार केली होती, असं त्याने सांगितलं होतं.
माझ्या गुघड्यांमध्ये कार्टिलेज नाहीये, ते पूर्णपणे खराब झालेत. त्यामुळे मी अयंग्गर योगाचा उपयोग केला.
या योगामुळे फक्त माझे पाय आणि शरिरच मजबूत राहिलं नाही तर मला मानसिक शांतता देखील मिळाली, असं रोहन बोपन्ना सांगतो.
अयंग्गर योगामुळे तुमचं शरिर तुम्हाला बळ देतं. एवढंच नाहीतर तुमचं कॉन्सेंट्रेशन देखील यामुळे वाढतं, असं रोहन म्हणतो.
बेल्जियमची राणी एलिजाबेथ द क्वीन मदर, सचिन तेंडूलकरपासून ते नसिरुद्धीन शाह देखील हा योगा करतात.