थंडीत ड्रायफ्रूटस कसे ठेवायचे असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.
थंडीच्या दिवसात ड्रायफ्रूट खराब होतात. त्यामुळे त्याची चव बदलते.
यामुळे ड्रायफ्रूट घरात ठेवण्याची योग्य पद्धत काय? ते आपण जाणून घेणार आहोत.
ड्राय फ्रुट किंवा कोणताही सुका पदार्थ ठेवण्यासाठी एयर टाईट कंटेनरचा वापर करा. जेणेकरुन ड्रायफ्रूट हवा लागून खराब होणार नाही.
जर तुम्ही प्लास्टिकच्या डब्ब्यात ड्रायफ्रूट ठेवत असाल तर त्याचे झाकण नीट बंद करा.
ड्रायफ्रूट हे थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवा. त्यामुळे ते जास्त दिवस टिकतील.
ड्रायफ्रूट्स काढताना ते कोरड्या हातांनीच काढा.
ड्रायफूट्स जास्त दिवस टिकवण्यासाठी ते तुम्ही भाजून ठेवू शकता. यामुळे त्यातील दमटपणा निघून जातो व ते जास्त दिवस टिकतात.
ड्रायफ्रूट्स ठेवण्यासाठी झिप लॉकच्या पिशव्याही वापरु शकता.