'टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकावा, पण...', CJI धनंजय चंद्रचूड यांनी धडाच शिकवला!

टीम इंडिया

सध्या टीम इंडिया वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करत आहे. टीम इंडियाने आत्तापर्यंतचे सर्व 7 सामने जिंकले आहेत.

सेमीफायनलचं तिकीट पक्कं

सर्व खेळाडूंच्या मजबूत खेळीमुळे टीम इंडियाने सेमीफायनलचं तिकीट पक्कं केलंय. त्यामुळे आता वर्ल्ड कप लांब नाही, असं म्हटलं जातंय.

धनंजय चंद्रचूड

अशातच आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश धनंजय चंद्रचूड यांनी मोठं वक्तव्य केलंय.

वर्ल्ड कप जिंकावा

भारतीय क्रिकेट संघाने वर्ल्ड कप जिंकावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केलीये. त्यावेळी त्यांनी असं काही म्हटलं की, सर्वांनी त्याचं कौतूक केलंय.

महिला संघ

केवळ पुरुषच नाही तर महिला संघानेही यश संपादन केले पाहिजे. महिला संघही मला न्यायाधीश म्हणून प्रेरित करतात, असं चंद्रचूड म्हणाले आहेत.

मी त्यांचा फॅन

मी त्यांचा फॅन आहे. मानसिक आरोग्य आणि समता राखण्याची पद्धत मला प्रभावित करते, असंही चंद्रचूड म्हणाले आहेत.

तरुणांना सल्ला

मी पुस्तके वाचतो आणि संगीत ऐकतो. यामुळे खूप शांतता आणि शक्ती मिळते. दिवसातून किमान 45 मिनिटे वाचन केले पाहिजे, असा सल्ला देखील त्यांनी तरुणांना दिला आहे.

VIEW ALL

Read Next Story