पॅट कमिन्सचं 70 कोटींचं आलिशान घरं पाहिलं का? पाहा खास Inside Photos

विक्रमी बोली

ऑस्ट्रेलियन संघाला वर्ल्ड कप 2023 मध्ये जेतेपद मिळवून देणाऱ्या पॅट कमिन्सला इंडियन प्रिमिअर लिगच्या 2024 च्या लिलावामध्ये विक्रमी बोली मिळाली.

20 कोटी 50 लाखांमध्ये करारबद्ध

पॅट कमिन्सला तब्बल 20 कोटी 50 लाख रुपये मोजून सनरायझर्स हैदराबादच्या संघाने करारबद्ध केलं आहे.

17 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच...

आयपीएलच्या 17 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच कोणत्याही खेळाडूने 20 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला असून सध्या कमिन्सच्या संपत्तीची चर्चा सुरु आहे.

कमिन्सचं घर

आयपीएल 2024 साठी 20.50 कोटी घेणार असलेल्या पॅट कमिन्सचं घरच 70 कोटींचं आहे. त्याच्या घराची झलक पाहूयात...

पत्नी आणि मुलाबरोबर राहतो कमिन्स

पॅट कमिन्सने बॅकी बोस्टनशी लग्न केलं आहे. या दोघांना अॅलबी नावाचा मुलगा आहे. याच वर्षाच्या सुरुवातीला पॅटच्या आईचं निधन झालं.

वयाच्या 18 व्या वर्षी पदार्पण

पॅट कमिन्सने 2011 साली ऑस्ट्रेलियन संघातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यावेळेस तो 18 वर्षांचा होता. सध्या तो 30 वर्षांचा आहे.

दुहेरी जबाबदारी

कमिन्स हा केवळ कर्णधार नसून गोलंदाजीची धुराही त्याच्या खांद्यावर आहे. तो सामान्यपणे मिचेल स्टार्कच्या बरोबरीने संघासाठी सुरुवातीच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करतो.

बंगल्याची किंमत तब्बल 70 कोटी

पॅट कमिन्सचा सिडनीमध्ये फार आलिशान बंगला आहे. या बंगल्याची किंमत तब्बल 70 कोटी रुपये इतकी आहे.

सजावट फार विचारपूर्वक

पॅट कमिन्सचं हे आलिशान घर फारच सुंदर आहे. घरातील सजावटही फार विचारपूर्वक पद्धतीने करण्यात आली आहे.

घरीच वेळ घालवायला आवडतो

क्रिकेटमधून विश्रांती मिळाल्यानंतर पॅट कमिन्सला त्याची पत्नी आणि मुलाबरोबर घरीच वेळ घालवायला आवडतो.

खर्चासाठी मागे पुढे पाहत नाही

कमिन्सचं घर पाहिल्यानंतर तो कुटुंबाच्या सुखासाठी पैसे खर्च करायला मागे पुढे पाहत नाही असेच म्हणावे लागेल.

VIEW ALL

Read Next Story