रात्री 3 ला ऐश्वर्याच्या घराचा दरवाजा ठोठावला अन्...; सलमान-ऐश्वर्याचं 'त्या' एका प्रसंगामुळे Breakup

सलमानचा वाढदिवस

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा आज वाढदिवस आहे. आज सलमान वयाच्या 59 व्या वर्षात पदार्पण करत आहे.

रिलेशन्समुळेही चांगलाच चर्चेत

सलमान खान हा त्याच्या अभिनयाबरोबरच त्याच्या रिलेशन्समुळेही चांगलाच चर्चेत राहिला.

लव्ह लाईफमध्ये अनेक महिला

कायम वादात अडकणाऱ्या सलमानच्या लव्ह लाईफमध्ये अनेक महिला आहेत. मात्र सर्वाधिक चर्चेत राहिलं ते एका खास व्यक्तीसोबतचं वादग्रस्त ठरलेलं नातं

ऐश्वर्या रायसोबतचं नातं

सलमानचं सर्वात चर्चेत राहिलेले रिलेशनमध्ये ऐश्वर्या रायसोबतचं नातं.

सेटवर पडले प्रेमात

1999 साली 'हम दिल दे चुके सनम'च्या सेटवर सलमान आणि ऐश्वर्या दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

सलमान सेटवर जाऊ लागला

मात्र नंतर सलमान ऐश्वर्याबद्दल फार पजेसिव्ह झाला. तो अचानक तिच्या चित्रपटांच्या सेटवर जाऊ लागला.

घराबाहेर गोंधळ

एकदा तर सलमानने रात्री 3 वाजता ऐश्वर्याच्या घराबाहेर गोंधळ घातला होता.

घराबाहेर आरडाओरड

सतत दरवाजा वाजवत दार उघडण्यासाठी सलमान ऐश्वर्याच्या घराबाहेर आरडाओरड करत होता.

सलमानने धमकी दिली

दार उघडून मला घरात घेतलं नाही तर मी जीव देईन अशी धमकी सलमानने दिल्याचं प्रसारमाध्यमांचे रिपोर्ट्स सांगतात.

सलमानला मोठा धक्का बसला

आपल्या कामापेक्षा सलमानच्या या स्टंटबाजीमुळे चर्चेत राहिल्याने ऐश्वर्याने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. सलमानला याचा फार मोठा धक्का बसला.

विवेकमुळे पुन्हा चर्चेत

ब्रेकअपच्या आसपास विवेक ऑबरॉय प्रकरणामुळे ऐश्वर्या आणि सलमान परत चर्चेत आले.

ऐश्वर्या विवेक ऑबोरॉयला डेट करत होती

2003 साली सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचं ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या विवेक ऑबोरॉयला डेट करत होती.

41 वेळा फोन

दरम्यान, विवेकने अचानक खळबळजनक दावा करत सलमानने आपल्याला 41 वेळा फोन करुन ऐश्वर्या रायबरोबरच्या नात्यावरुन धमकावल्याचं सांगितलं.

कायमची दरी निर्माण झाली

यानंतरपासून विवेक आणि सलमानमध्ये कायमची दरी निर्माण झाली जी आजही कायम आहे.

अभिषेक बच्चनशी लग्न

नंतर ऐश्वर्याने अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनशी लग्न केलं. या दोघांना आराध्या नावाची मुलगीही आहे.

VIEW ALL

Read Next Story