तुमचा स्वभाव पॉझिटीव्ह की निगेटीव्ह? ब्लड ग्रुपरवरून जाणून घ्या अनेक गुपितं

तुम्ही कधी 'Ketsueki gata' हा ऐकायला का? ही एक जपानची संकल्पना असून तुमच्या ब्लड ग्रुपनुसार (Personality according to the blood type) व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व, आणि अन्य गोष्टीचं गुपितं समजतं.

ब्लड ग्रुपचं एकूण चार प्रकार असून A, B, AB आणि O यावरुन तुमचा स्वभाव समजू शकतो.

ब्लड ग्रुप A

लोकं खूप संवेदनशील, सहकार्य करणारे आणि भावनिक स्वभावाचे असतात. ते अतिशय हुशार आणि प्रामाणिक असल्याने तुमच्यामध्ये खूप सहनशक्ती दिसून येते. हे शांतप्रिय असून वाद घालणं आवडत नाही. समाजाचे नियम मोडणं आवडत नाही. ही लोकं खूप विचारपूर्वक निर्णय घेऊन काम करतात. ते मल्टीटास्क करु शकत नाही. नेहमी स्वच्छ आणि नीटनीटके राहणीमान प्रिय आहे. कोणत्याही गोष्टीचा खूप लवकर ताण घेतात. ही विश्वासू मित्र असतात.

B ब्लड ग्रुप

ही लोकं खूप क्रिएटिव्ह असून लवकर निर्णय घेण्यात सक्षम असतात. ते प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष केंद्रित करुन काम करतात. ही लोकं मल्टीटास्क करण्यात अपयश ठरतात. ते इतरांविषयी सतत विचार करतात आणि त्यांनी नेहमी इतरांविषयी सहानभूती जाणवते. ते नेहमी विश्वासार्ह मित्र असतात. यांच्या मनात अनेकदा नकारात्मक विचार घर करतात. नकारात्मक व्यक्तिमत्त्वामुळे अनेकदा ते एकटं राहतात.

ब्लड ग्रुप AB

हे लोक खूप मनमोहक असून खूप लवकर मित्र होतात. कोणत्याही प्रकारचा तणाव किंवा ताण त्यांना हाताळणे शक्य होत नाही. इतर लोकांबरोबर ते खूप काळजीपूर्वक वागणूक देतात. इतरांप्रती सहानभूती दाखवतात. या लोकांकडे खूप चांगली आकलनशक्ती आणि तर्क कौशल्ये असतं.

O ब्लड ग्रुप

अतिशय धाडसी, बिनधास्त आणि आत्मविश्वासू स्वभावाचे असतात. ते स्वत:ला उच्च स्तरावर नेण्याचा प्रयत्न करुन कामात मेहनत घेतात. या लोकांमध्ये उत्कृष्ट नेतृत्व गुण असल्याने लहान लहान गोष्टींचा त्रास करुन घेत नाही. ते उदार स्वभावाचे असून खूप दयाळू असतात. कोणताही नवीन बदल ते लगेच अंगीकारतात. कठीण प्रसंगात खंबीरपणे उभे असतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story