ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघ गोल्ड जिंकणार? 44 वर्षांनंतर हा योगायोग

भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या सेमीफायनलमध्ये धड मारी आहे. हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाला यावेळी सुवर्णपदक जिंकण्याची संधी आहे. सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा मुकाबला जर्मनीशी आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने आतापर्यंत दमदार कामगिरी केलीय. क्वार्टर फायनलमध्ये टीम इंडियाने ग्रेट ब्रिटेनचा पेनाल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असा पराभव केला.

आता 6 ऑगस्टला टीम इंडिया आणि जर्मनीत सेमीफायनलचा सामना रंगेल. जर्मनीने क्वार्टर फायनलमध्ये बलाढ्या अर्जेंटिनाचा पराभव करत सेमीफायनलमध्ये धडक मारलीय.

यंदा भारतीय हॉकी संघाला सुवर्ण पद जिंकण्याची चांगली संधी आहे. तब्बल 44 वर्षांनी हा योगायोग आलाय. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलिया आणि बेल्जियम सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.

याआधी 1980 मध्ये सेमीफायनलआधीच ऑस्ट्रेलिया-बेल्जिअमला पराभव स्विकारावा लागला होता. या ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने सुवर्ण पदक जिंकलं होतं.

1980 मॉस्को ऑलिम्पिकमध्ये हॉकी प्रकारात केवळ 5 देशांनी भाग घेतला होता. यात भारत, सोवियात संघ, चेकोस्लोवाकिया, झिम्बाब्वे आणि स्पेन संघांचा समावेश होता. अंतिम फेरीत भारताने स्पेनचा पराभव करत सुवर्ण पदक पटकावलं होतं.

ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने आतापर्यत 8 सुवर्ण, 1 रौप्य आणि तीन कांस्य पदकं अशी एकूण 12 पदकं जिंकली आहेत.

VIEW ALL

Read Next Story