शास्त्रज्ञांचा चंद्रावर मानवी वस्ती करण्यासाठी बऱ्याच काळापासून काम करत आहेत. त्याचबरोबर रोज नवनवीन कल्पनांनवर काम करत आहेत.
तसेच चंद्रावर भिंत बांधण्याची कल्पना ज्युरिचमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या जोनास वाल्थर यांना सुचली.
ही भिंत बांधण्यासाठी पृथ्वीवरून कोणतेही साहित्या घेतले जाणार नाही तर त्याच ठिकाणी रोबोटच्या मदतीने साहित्य शोधून वापरले जातील.
space.com सोबत बोलताना जोनास वाल्थर म्हणाले की, या रोबोटचा वापर दगड गोळा करण्यासाठी आणि भिंत बांधण्यासाठी केला जाईल.
जोनास वाल्थर म्हणाले की. ही भिंत 50 ते 100 मीटरत्या त्रिज्येची अंगठीच्या आकारामध्ये बनवली जाईल.
वाल्थरांच्या मते, भिंत बांधण्यासाठी पृथ्वीवरून साहित्य घेऊन जाणे महाग असेल तर स्वयंचलित रोबोट सोपं जाईल.
शास्त्रज्ञांच्या मते मानव चंद्रावर कायमचा स्थायिक झाल्यानंतर रॉकेटद्वारे वारंवार भेट देणे चंद्रासाठी नुकसानकारक ठरेल.
पृथ्वीनंतर चंद्र हे मानवासाठी सर्वात जवळचं ठिकाण असेल त्यामुळे शास्त्रज्ञ ते मानवासाठी अनुकूल बनवण्याचा प्रयत्न करत आहे.