लहानपणी प्रत्येकाने आकाशातील तारे मोजण्याचा प्रयत्न केला असेलच पण त्यात कधी यश मिळू शकले नाही.
बरेच लोक म्हणतात की आकाशातील तारे मोजणे अशक्य आहे. पण विज्ञानाने आणि तंत्रज्ञानाच्या युगात अशक्य असे काही नाही.
नासाने आकाशातील ताऱ्यांच्या संख्येचा अंदाज लावला आहे. ताऱ्यांची ही संख्या ऐकल्याने तुम्ही नक्कीच अवाक व्हाल.
नासाने केलेल्या अभ्यासानुसार, विश्वात एक सेप्टिलियन तारे असू शकतात. याचा अर्थ एका आकाशगंगेत 100 अब्जाहून अधिक तारे असू शकतात.
विज्ञानानुसार या विश्वात अगणित आकाशगंगा आहेत. त्या सर्वांचे स्वत:चे वेगवेगळे तारे आणि सौरयंत्रणा आहेत. या सर्वांची ताऱ्यांची संख्या मोजणे कठीण आहे. पण आपल्या पृथ्वीच्या आकाशगंगेचा अंदाज लावला गेला आहे.
तारे हे हायड्रोडन, हेलियम आणि इतर घटकांपासून तयार होतात.
सूर्य हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा असून अलिकडेच इस्त्रोने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्या L1 लॉन्च केले होते.
असे म्हटले जाते की ताऱ्यांचे आयुष्य 1 अब्ज ते 10 अब्ज वर्षापर्यंत असते. पण काही तारे यापेक्षाही जुने आहेत.