क्रीडाविश्वातील बहुचर्चित कपल सानिया मिर्झा आणि शोएब मलिक आता एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलंय.
42 वर्षाचा पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केलं. त्याचे फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहेत.
शोएब मलिक कुटूंबियांना देखील याची माहिती नव्हती, असं पाकिस्तानी मीडियाच्या माध्यमातून समोर येतंय. त्यामुळे त्याच्यावर टीका देखील होताना दिसतेय.
शोएबने तिसरे लग्न केल्यानंतर पाकिस्तानातील अभिनेत्री सेहर शिनवारीने सोशल मीडियाच्या माध्यमातून मलिकवर निशाणा साधला आहे.
सर्व महिलांनी शोएब मलिकसारख्या अविश्वासू पुरुषांवर सामाजिक बहिष्कार टाकला पाहिजे. असे लोक त्यांच्या आयुष्यातील कोणत्याच स्त्रीसाठी पात्र नसतात, असं सेहर म्हणते.
सानिया मिर्झासोबत असं करताना त्याला लाज वाटली नाही का? असा खडा सवाल देखील अभिनेत्रीने विचारला आहे.
सानियाने शोएबपासून तलाक घेतलेला नाही तर त्यांचा 'खुला' झाला आहे, असं सानियाच्या वडिलांनी सांगितलं आहे. स्त्रीकडून लग्नाचं नातं संपवलं जातं तेव्हा त्याला खुला म्हणतात.