पराठ्यासोबत दही खाणं टाळा नाहीतर...

हिवाळ्यात पराठे खायला सर्वांनाच आवडतात. शरीराला पुरेशी ऊर्जा मिळाण्यासाठी पराठे खूप उपयुक्त ठरतात.

घरात बटाटा, कांदा, चीज, पालक, मुळा आणि इतर गोष्टींचे पराठे बनवले जातात. बर्‍याच जणांना पराठे दहीसोबत खायला आवडतात. पण दही आणि पराठा एकत्र खाल्ल्याने अनेक दुष्परिणाम होतात.

पराठ्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि फॅट जास्त असतात. तर दह्यामध्ये प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. दोन्ही गोष्टी एकत्र खाल्याने पचनक्रिया बिघडते नाहीतर, पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात

पराठा आणि दही दोन्ही पचायला जड असतात, जे नीट पचत नाहीत किंवा पचायला खूप वेळ लागतो. अशा परिस्थितीत दोन्ही एकत्र खाल्याने पचनक्रिया मंदावते आणि यामुळे अपचन, गॅस, पोट फुगणे अशा अनेक समस्या होऊ शकतात.

पराठा आणि दही या दोन्हीमध्ये भरपूर कॅलरीज असतात. हे दोन्ही एकत्र खाल्ले की झपाट्याने वजन वाढू लागते. त्यामुळे तुमचा फिटनेस सुधारायची असेल आणि वजन वाढवायचे नसेल तर दही आणि पराठे एकत्र खाऊ नका.

पराठा आणि दही दोन्ही आम्लयुक्त असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दोन्ही एकत्र सेवन केल्यास त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. दह्यासोबत पराठे खाल्ल्याने मुरुम होऊ शकतात आणि चेहऱ्याचे सौंदर्य खराब होऊ शकते. त्यामुळे हे टाळावे.

VIEW ALL

Read Next Story