‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेमुळे अभिनेता शशांक केतकर घराघरांत लोकप्रिय झाला. शशांकने त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी आहे.

शशांकने नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे. यासंदर्भात त्याने खास पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

"नवीन technology नी मला कायमच भुरळ घातली आहे. Electric vehicle असा काही प्रकार असतो हे ज्या वयापासून मला कळू लागलं आहे तेव्हा पासून, आपण एकदा एक EV घ्यायची हे स्वप्नं होतं." असे शशांक म्हणाला.

"मागच्या १४ वर्षात माझ्या ३ गाड्या झाल्या. पहिली marutisuzukiofficial Ertiga दुसरी kiaind Seltos आणि आता tata.evofficial Nexon.ev !" असे शशांकने म्हटले आहे.

"मागच्या वर्षी जेव्हा मी ola electric घेतली, तेव्हाच ठरवलं होतं की योग्य वेळं आली की, petrol car वरून मी EV car वर सुद्धा shift होईन! आणि वर्षभरातच EV car दारात आली देखील", असे शशांकने म्हटले आहे.

शशांकने पांढऱ्या रंगाची टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे.

Financial Express ने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या बाजारात या गाडीची किंमत जवळपास १४.७४ लाख ते १९.९४ लाख (एक्सशोरुम) एवढी आहे.

सध्या तो ‘मुरांबा’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

VIEW ALL

Read Next Story