वर्ल्ड कपनंतर आता सर्वांना उत्सुकता लागलीये ती चॅम्पियन ट्रॉफीची... वर्ल्ड कपमधील टॉप आठ संघ त्यासाठी पात्र झाले आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीचं शेवटचं आयोजन 2017 मध्ये इंग्लंडमध्ये झालं होतं. त्यावेळी पाकिस्तान क्रिकेट संघाने गेल्या वेळी चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं होतं.
अशातच आता आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा ही पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे. आयसीसीने यावर शिक्कामोर्तब केला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आयसीसीसोबत होस्टिंग हक्क करारावर स्वाक्षरी केली आहे. या स्पर्धेसाठीच्या करारावर झका अश्रफ यांनी स्वाक्षरी केल्याची माहिती पीसीबीने दिली आहे.
2008 पासून भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. भारतीय संघाला सरकारकडून परवानगी मिळाली नव्हती. त्यामुळे आता चॅम्पियन ट्रॉफी खेळणार का? असा सवाल विचारला जातोय.
बीसीसीआयने घेतलेल्या आक्षेपामुळे आशिया कपची स्पर्धा देखील हायब्रीड मॉडेलवर खेळवण्यात आली होती.
भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इंग्लंड, बांगलादेश या आठ संघांनी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी क्वालिफाय केलंय.