रुबिना दिलैक हिच्याबद्दल एक गोड बातमी समोर आली, रुबिना आणि अभिनव आई-वडील झाल्याचं सांगण्यात येत आहे.
अभिनेत्रीबद्दलची ही आनंदाची बातमी तिच्या पिलाटे ट्रेनरने सोशल मीडियावर शेअर करत अभिनंदन केले आणि सांगितले" ती जुळ्या मुलींची आई झाली आहे".
रुबिनाच्या ट्रेनरने ही पोस्ट शेअर करताच चाहत्यांनी आणि प्रियजनांनी अभिनेत्रीला आई झाल्याबद्दल अभिनंदन करण्यास सुरुवात केली.
रुबिना आणि अभिनव 2018 मध्ये लग्नाच्या बंधनात अडकली, लग्नानंतर पाच वर्षांनी ती आई झाली. रुबिनाने तिच्या प्रेग्नेंसी पीरियडचा खूप आनंद घेतला आहे आणि तिच्या मॅटर्निटी फोटोशूटने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.
रबिनानं गोड जुळ्या मुलींना जन्म दिल्याची माहिती येत आहे.
अभिनेत्रीने यूट्यूब चॅनलवर एक नवीन शो सुरू केला होता, ज्याचे शीर्षक कोणीही उघड केलेले नाही.. तिच्या शोमध्ये रुबिना इंडस्ट्रीतील मातांशी बोलताना दिसली होती. यादरम्यान तिने सांगितले की, तिच्या प्रेग्नेंसीच्या काळात तिचे वाढलेले वजन आणि फॅशन सेन्समुळे तिला खूप ट्रोल करण्यात आले.
आता रुबिना आणि अभिनवनी ते पालक झाले स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे चाहत्याचं त्यांच्या घोषणे कडे लक्ष राहील.