जॉस बटलर कोणाचा आवडता प्लेयर नाही? संयमी पण प्रभावी मारा करण्यात बटलरचा हात कोणीच धरू शकत नाही. आपल्या आक्रमक खेळीच्या जोरावर बटलरने इंग्लंडला वर्ल्ड कप देखील जिंकवलाय.
इंग्लंडचा जो रूट देखील आपला फेवरेट असल्याचं बाबर म्हणतो. इंग्लंडविरुद्ध सामना असल्याच बाबर रुटसाठी खास फिल्डिग देखील लावतो.
बाबर आझमच्या आवडत्या क्रिकेटरच्या यादीत एका पाकिस्तानी खेळाडूला देखील स्थान मिळालंय. त्याचं नाव अब्दुल्ला शफीक फक्त 12 टेस्ट आणि 6 टी-ट्वेंटी सामने खेळणाऱ्या अब्दुल्लाच्या बॅटिंगचा चाहता आहे बाबर.
बाबर आझमच्या मॉर्डन डे क्रिकेटरच्या यादीत पहिल्या क्रमांकावर येतो तो म्हणजे केन विलियमसन. केनच्या कॅप्टन्सीची झलक बाबरच्या कॅप्टन्सीमध्ये देखील दिसून येते.
मोहम्मद रिझवान या पाकिस्तानी सलामीवीराचं नाव बाबर अनेकदा घेत असतो. मात्र, त्याच्या फेवरेट क्रिकेटर्सच्या यादीत रिझवानचं देखील नाव नाहीये.
बाबर आझमला जेव्हा फेवरेट क्रिकेटर कोण? असा सवाल विचारला गेला. तेव्हा विराटच्या नावाची सर्वांना अपेक्षा होती. मात्र, त्याने विराटचं नाव घेतलं नाही.
बाबर आझम म्हणतो, मला 'हा' क्रिकेटर आवडतो!