कुशलचे चाहते आणि तो सध्या काय करतोय

कुशलचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर 293K फॉलोवर्स आहेत. तर तो सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या निमित्तानं लंडनला गेला आहे. (All Photo Credit : Kushal Badrike Instagram)

ट्रेन आणि आयुष्याच्या प्रवासात काय असतो फरक कुशल म्हणाला...

आयुष्याच्या प्रवासात कोणत्याच इंडिकेटरला रिटर्न ट्रेन नसते. आपलं उतरायचं स्टेशन आणि माणसं एकदा चुकली, की चुकली…….. (सुकून) असं कुशल म्हणाला.

ट्रेन आणि आयुष्याच्या प्रवास सारखा कुशलनं पुढे सांगितला

आयुष्याचा प्रवास हा थोड्याफार फरकाने ट्रेनच्या प्रवासासारखाच असतो, नाही का? आपण थांबायचं ठिकाण चुकलं की मग एका अनोळखी जगाचा प्रवास सुरू होतो.

अनोळखी स्टेशनवर उतरण्याविषयी कुशल म्हणाला...

कुशल म्हणाला मग पुढे एखाद्या अनोळखी स्टेशनला उतरायचं, अनोळखी पाट्या, अनोळखी स्टॉल्स, अनोळखी माणसं. पण इंडिकेटर वरची रिटर्न ट्रेन मिळेपर्यंत, सगळं ओळखीचं होऊन जायचं.

ट्रेनचा प्रवासाविषयी कुशल पुढे म्हणाला...

ट्रेनच्या खिडकीतून बाहेर डोकावलं तर वेगळेच रस्ते, वेगळ्याच बिल्डिंग्स, आणि मग लक्षात यायचं, की सालं आपण उतरायचं स्टेशन तर मागेच राहून गेलं !

ट्रेनच्या प्रवासाविषयी कुशल म्हणाला...

स्ट्रगलच्या काळातला ट्रेनच्या प्रवासात, कधीकधी चुकून डुलकी लागायची, थोड्यावेळाने डोळे उघडले की आजूबाजूला वेगळीच माणसं दिसायची.

कुशलनं शेअर केली खास पोस्ट

कुशलनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये कुशल त्याच्या स्ट्रगलच्या दिवसांविषयी बोलताना दिसला.

VIEW ALL

Read Next Story