ना रोहित ना विराट! युवराज सिंग म्हणतो, 'या' खेळाडूला मॅन ऑफ द टुर्नामेंट द्या

युवराज सिंह म्हणतो...

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड कप फायनल सामन्यापूर्वी टीम इंडियाला 2011 साली वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या युवराज सिंह याने मोठं वक्तव्य केलं आहे.

पहिले तीन फलंदाज

पहिले तीन फलंदाज लवकर बाद झाले तर संघावर दबाव येऊ शकतो. तसं झालं नाही तर भारताला हरवणं कठीण असेल, असं मत देखील युवीने व्यक्त केलं आहे.

ऑस्ट्रेलिया

लक्षात ठेवा समोर ऑस्ट्रेलिया आहे, जो फायनलचं दडपण चांगल्या प्रकारे हाताळतो, त्यांनी अनेक फायनल जिंकल्या आहेत, असं म्हणत युवीने टीम इंडियाला विजयाचा मंत्र दिला आहे.

मोहम्मद शमी

आपल्या घातक गोलंदाजीमुळे मोहम्मद शमीला मॅन ऑफ द टूर्नामेंटचा किताब मिळायला हवा, असं मत युवराज सिंग याने मांडलं आहे.

गौतम गंभीर

मी जेव्हा गौतम गंभीरशी बोलतो तेव्हा तो म्हणतो की, फक्त गोलंदाजच सामना जिंकतात. या विश्वचषकातही गोलंदाज आम्हाला सामने जिंकून देत आहेत.

वर्ल्ड कप

फलंदाज तुम्हाला सामना जिंकवतात. मात्र, गोलंदाज तुम्हाला वर्ल्ड कप जिंकून देतात, असंही युवराज सिंग याने म्हटलं आहे.

गोलंदाजांची जादू

आजकाल एकदिवसीय सामन्यात 350 धावाही पुरेशा नाहीत. ज्याला अंतिम फेरीत विजय मिळवायचा असेल त्याला लवकर विकेट पडावी लागतील. गोलंदाजांना त्यांची जादू दाखवावी लागेल.

अपेक्षा चुकीचं

जेव्हा तुमचे सात फलंदाज काही करू शकत नाहीत तेव्हा आठव्याकडून अपेक्षा करणे चुकीचं आहे, असं म्हणत युवराजने रोहितला उत्तर दिलंय.

VIEW ALL

Read Next Story