पावसाचा काय भरवसा?

या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता कमी आहे. मात्र, हवामान बदललं तर काही सांगता येत नाही. त्यामुळे पावसामुळे अंतिम सामना पाण्यात वाहून गेला तर काय होईल याची अनेकांना उत्सुकता आहे.

आयसीसीची आधीपासून तयारी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे. अशा परिस्थितीत जर अंतिम सामन्यादरम्यान पाऊस पडला तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच रिझर्व्ह डेला मॅच होईल.

रिझर्व्ह डेला पण पाऊस पडला तर...

आयसीसीच्या मते, रिझर्व्ह डेलाहीही पाऊस पडला तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल. 2002 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत आणि श्रीलंका संयुक्त विजेते असताना हे दिसून आले.

आजपर्यंत कधीच असं झालं नाही

क्रिकेट वर्ल्डकपच्या 48 वर्षांच्या इतिहासात आजपर्यंत एकही अंतिम सामना रिझर्व्ह डेला आयोजित करण्यात आलेला नाही आणि विजेत्या संघाचा निर्णय नियोजित दिवशीच झाला.

रिझर्व्ह डे कधी लागू केला जातो?

अंम्पायर त्याच दिवशी अंतिम सामना पूर्ण करण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करतील. यासाठी हा सामना किमान 20 षटकांचा करता येईल. तेवढी षटकेही खेळता आली नाहीत, तरिझर्व्ह डेला सामना ठेवण्याचा निर्णय घेऊ शकतात.

तर मग दोन्ही संघांना करावं लागेल विजेता

रिझर्व्ह डेलाही किमान 20-20 षटके खेळणे आवश्यक आहे. पावसामुळे त्या दिवशी खेळ होऊ शकला नाही, तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल.

सामना टाय झाला तर काय?

अंतिम सामना टाय झाला तर त्यात सुपर ओव्हर घेण्यात येईल. जर सुपर ओव्हरही बरोबरीत सुटली तर अशावेळी पुन्हा सुपर ओव्हर घेण्यात येईल. एक संघ जिंकेपर्यंत हे सुपर ओव्हर्स चालू राहतील. (सर्व फोटो - @CricketAus, @BCCI)

VIEW ALL

Read Next Story