विराटशी पंगा घेणाऱ्या नवीन-उल-हकने अचानक घेतली 24 व्या वर्षी निवृत्ती!

धक्कादायक

आगामी वर्ल्ड कपपूर्वी अफगाणिस्तान क्रिकेटमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

वनडे क्रिकेटमधून निवृत्ती

अफगाणिस्तानचा स्टार ऑलराऊंडर नवीन-उल-हक याने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

सन्मानाची गोष्ट

माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणं ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे, या विश्वचषकाच्या शेवटी मी एकदिवसीय फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा करू इच्छितो, असं नवीन उल हक याने म्हटलं आहे.

टी-20 खेळत राहिल

माझ्या देशासाठी टी-20 क्रिकेटमध्ये ही निळी जर्सी घालत राहीन, हा निर्णय घेणं सोपं नव्हतं, असं नवीन उल हक याने म्हटलं आहे.

कारण काय?

माझी खेळण्याची कारकीर्द लांबवण्यासाठी हा कठोर निर्णय घ्यावा लागला, असं म्हणत त्याने निवृत्तीचं कारण सांगितलंय.

खूप खूप आभार

माझ्या सर्व चाहत्यांना त्यांच्या पाठिंब्याबद्दल आणि अतूट प्रेमासाठी खूप आभार, असं नवीनने म्हटलं आहे.

विराट कोहली

नवीन उल हक हा चर्चेत राहिला भांडणामुळे... विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यातील आयपीएलमधील वाद सर्वांना माहित आहे.

VIEW ALL

Read Next Story