तू 'टायगर 3'मध्ये दिसणार का? शाहरुख स्पष्टच म्हणाला, 'जेव्हा जेव्हा...'

'टायगर 3'चा टिझर

सलमान खानच्या 'टायगर 3' चित्रपटाचा टिझर बुधवारी रिलीज झाला.

भन्नाट अॅक्शन

'टायगर 3'च्या टिझरमध्ये भन्नाट अॅक्शन पाहायला मिळत आहे.

गुप्तहेराच्या भूमिकेत

सलमान या 'टायगर 3'मध्येही एका गुप्तहेराच्या भूमिकेतच दिसत आहे.

स्पाय युनिव्हर्सपैकी एक

'टायगर 3' हा चित्रपट यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सपैकी एक चित्रपट असल्याचं सांगितलं जात आहे.

'टायगर 3'चा टिझर चाहत्यांना आवडला

'टायगर 3'चा टिझर चाहत्यांना चांगलाच पसंत पडला आहे. सोशल मीडियावर दिवसभर याच टिझरची चर्चा होती.

'टायगर 3'ची उत्सुकता शिगेला

2023 च्या दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेल्या 'टायगर 3'ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

'टायगर 3'मध्ये शाहरुख दिसणार का?

अशातच 'टायगर 3'मध्ये किंग खान म्हणजेच शाहरुख खान पाहुणा कलाकार म्हणून सहभागी होणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

शाहरुखने 'पठाण'मध्ये साकारलेली भूमिका

सलमान खानने शाहरुखच्या 'पठाण'मध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.

शाहरुख दिसणार का अशी उत्सुकता

त्यामुळे आता सलमानच्या 'टायगर 3'मध्ये शाहरुख दिसणार का अशी उत्सुकता आहे.

शाहरुखनेच दिलं उत्तर

चाहत्यांच्या या प्रश्नाचं उत्तर शाहरुख खाननेच एक्स अकाऊंटवरुन (आधीचं ट्वीटर) दिलं आहे.

कोणता प्रश्न विचारण्यात आला?

एका चाहत्याने तू 'टायगर 3'मध्ये इंटरवल आधी दिसणार की नंतर असा प्रश्न शाहरुखला #AskSRK मध्ये विचारला.

शाहरुखने काय उत्तर दिलं?

शाहरुखने या प्रश्नाला उत्तर देताना, "जेव्हा जेव्हा (सलमान) भाई बोलवणार तेव्हा तेव्हा मी येणार" असं म्हटलं आहे.

VIEW ALL

Read Next Story