रवीना टंडन बॉलिवूडच्या कुशल अभिनेत्रींपैकी एक आहे. 90 चं दशक गाजवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये रवीना टंडनचाही समावेश आहे

'पत्थर के फूल' चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या रवीना टंडनने इतक्या वर्षात 'नो किस पॉलिसी' कायम ठेवली आहे.

आपल्या 32 वर्षांच्या करिअरमध्ये रवीनाने आजपर्यंत एकदाही किसिंग सीन दिलेला नाही. एका मुलाखतीत रविनाने कशाप्रकारे एकदा सहकलाकाराने चुकून तिला किस केलं होतं हे सांगितलं.

एका चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान सहकलाकाराचे ओठ तिच्या ओठाला लागले होते. यामुळे ती इतकी अस्वस्थ झाली होती की, उलट्या करु लागली होती.

रवीनाने सांगितलं की, "माझ्यासाठी हे फार कठीण होतं. मला आठवत मी एक सीन शूट करत होती. एका पुरुष कलाकारासह झटापटीचा सीन होता. त्यावेळी त्याचे ओठ माझ्या ओठाला लागले होते".

"ही एक चूक होती. स्क्रिप्टमध्ये याची गरजच नव्हती. एका सीनमध्ये अचानक हे झालं आणि त्यानंतर मी रुममध्ये जाऊन उलटी करु लागले," असं रवीनाने सांगितलं.

"मी इतकी अस्वस्थ झाली होते की, शॉट संपताच मी पळत माझ्या रुममध्ये गेले आणि उलटी झाली. मी ते सहनच करु शकले नाही, शी".

आपल्या सहकलाकाराने आपली माफी मागितली होती. तो व्हिलनची भूमिका निभावत होता असंही रवीनाने सांगितलं.

दरम्यान रवीनाने आपण नो किसिंग पॉलिसी ठेवली असली तरी मुलगी राशा अशा सीनसंबंधी स्वत: निर्णय घेईल असं स्पष्ट केलं.

रवीनाने सांगितलं की, "ते सर्व तिच्यावर अवलंबून आहे. जर ती एखाद्यासह सहज असेल तर का करु नये. आणि जर तिला आवडत नसेल तर जबरदस्ती करण्याचा प्रश्नच येत नाही".

VIEW ALL

Read Next Story