सध्या भारतात सुरू असेल्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने आत्तापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. रोहित अँड कंपनीने 5 पैकी 5 ही सामने खिशात घातले आहेत.
भारतीय संघाच्या या कामगिरीनंतर वर्ल्ड कप जिंकणार का? असा सवाल विचारला जात आहे. अशातच आता टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने मोठी भविष्यवाणी केली आहे.
एका मुलाखतीत धोनीला बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकणार का? असा सवाल विचारण्यात आला होता. त्यावेळी धोनीने इशाऱ्यात उत्तर दिलं.
भारताची सध्याची टीम उत्तम आहे. संघाचा समतोल जबरदस्त आहे. सर्वजण उत्तम कामगिरी करत आहेत, असं धोनी म्हणतो.
विजेता कोण होणार याबाबत मी जास्त काही बोलू शकत नाही. समजने वालों को इशारा काफी है, असं महेंद्रसिंह धोनी म्हणतो.
धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2011 मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर आता 12 वर्षानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया वर्ल्ड कपवर नाव कोरणार का? असा सवाल विचारला जातोय.
दरम्यान, मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीये. क्रिकेटमधून नाही, असं म्हणत धोनीने आयपीएल खेळण्याचे संकेत दिले आहेत.