हिवाळ्यात रोज मुळा खाण्याचे 'हे' आहेत फायदे!

रोजच्या जेवळात मुळा खाल्ल्याने आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतो. हिवाळ्यात मुळा खाणे खूप लाभदायक असते.

Mansi kshirsagar
Oct 27,2023


मुळा हा औषधी गुणधर्मयुक्त आहे. त्यामुळं हिवाळ्यात मुळा खाणे खूप गरजेचे आहे


मुळ्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळं पचनक्रिया सुधारते. पोट निरोगी ठेवण्यासाठी मुळा उपयुक्त आहे.


मुळ्यात कंजेस्टिव्ह गुणधर्म असतात जे घशातील श्लेष्मा साफ होतो. हिवाळ्यातील सर्दीवर आराम मिळु शकतो


मुळ्यामुळं रोगप्रतिकारशक्ती वाढते त्याशिवाय मुळ्यात जीवनसत्वे ए,सी,ई,बी 6 पोटॅशियम असतात.


हपोटॅशियमने समृद्ध असणारा मुळा शरीरात सोडियम-पोटॅशियम संतुलित राखून रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो


मुळ्यात फॉस्फरस आणि जस्त असते त्यामुळं त्वचेसाठी फायदेशीर ठरतो.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story