Lionel Messi: चीन पोलिसांनी फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सीला घेतलं ताब्यात, काय आहे प्रकरण?

लिओनेल मेस्सी बीजिंगमधील वर्कर्स स्टेडियमवर अर्जेंटिना विरुद्ध ऑस्ट्रेलिया फ्रेंडली मॅच खेळण्यासाठी गेला होता.

लिओनेल मेस्सीला व्हिसा प्रकरणामुळे चिनी पोलिसांनी विमानतळावर ताब्यात घेतलं होतं. मात्र, काही वेळाने हे प्रकरण शांत झालं आणि मेस्सीची सुटका झाली.

लिओनेल मेस्सीकडे अर्जेंटिना ऐवजी स्पॅनिश पासपोर्ट सापडला, त्यामुळे त्याच्याकडे चीनचा विजा नव्हता

मेस्सी स्पॅनिश पासपोर्टवर प्रवास करत होता आणि मेस्सीकडे चीनचा व्हिसा नव्हता. त्यामुळेच मेस्सीला विमानतळावर थांबवण्यात आले.

चिनी विमानतळावरील सुरक्षा रक्षकांशी संवाद साधताना मेस्सीला सुरुवातीला भाषेच्या समस्या आल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

लिओनेल मेस्सी 30 मिनिटे विमानतळावर होता, विमानतळावर वीजा आणि पासपोर्ट गैरसमज झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये लिओनेल मेस्सीला पोलिसांनी घेरले आहे, व्हिडिओमध्ये मेस्सी पोलिसांशी बोलताना दिसत आहे.

लिओनेल मेस्सीकडे स्पॅनिश पासपोर्ट होता, ज्यामुळे चीनमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेश मिळत नव्हता.

VIEW ALL

Read Next Story