अशी कामगिरी करणारा KL Rahul तिसरा खेळाडू!
तब्बल 4 महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय सामन्यात कमबॅक करणाऱ्या केएल राहुलने पाकिस्तानविरुद्ध 14 धावा काढताच मोठा विक्रम नावावर केला आहे.
केएल राहुल आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा पूर्ण करणारा भारताचा तिसरा फलंदाज ठरलाय.
शिखर धवन या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे ज्याने 48 डावात 2000 धावा पूर्ण केल्या होत्या.
दुसऱ्या स्थानावर नवज्योतसिंग सिद्धू आणि सौरव गांगुली आहेत, ज्यांनी 52 डावांमध्ये ही कामगिरी केली होती.
याशिवाय विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 53 डावात 2000 धावा पूर्ण केल्या. त्यानंतर आता केएल राहुलने बरोबरी केलीये.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या जागी केएल राहुलचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आलाय.
पाकिस्तानविरुद्ध 14 धावा करताच राहुलच्या 2000 धावा पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे आता तो वनडेमध्ये चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जातीये.