आचार्य विनोबा भावे यांची आज जयंती. त्यानिमित्त वाचा जीवनाबद्दलचे त्यांचे 12 सुंदर विचार

यशस्वी शिक्षण हा यशस्वी जीवनाचा पाया आहे.

विद्येचे चांगले फळ म्हणजे उत्तम चारित्र्य आणि सदाचार.

प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे, प्रेम नसताना जर कोणी सेवा करीत असेल, तर तो व्यापार आहे असे समजावे.

जेव्हा ईश्वराने मानवाची निर्मिती केली तेव्हा त्याने मानवाला तीन पाने दिली. पहिल्या पानावर जन्म लिहिला तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिला. जे दुसरे पण होते ते कोरे ठेवले. त्यावर काय लिहायचं ते मानवाच्या हातात होतं. मानव जसे कर्म करून जगतो ते पान पण भरत जाते. या दुसऱ्या पानाला जीवन म्हटले आहे.

प्रेम करणे ही एक कला आहे, पण प्रेम टिकवणे हि एक साधना आहे.

विचारांचा चिराग विझला, तर आचार आंधळा बनेल.

ईश्वर गरीब मनुष्याला गरीब ठेवून त्याच्यात हिंम्मत आहे कि नाही ह्याची कसोटी घेत असतो.

माणसाचे सर्वात मोठे तीन शत्रू आहेत – आळस, अज्ञान आणि अंधश्रद्धा

सेवेसाठी पैशांची आवश्यकता नसते स्व:ताचे संकुचित जीवन सोडण्याची आणि गरिबांशी एकरूप होण्याची गरज असते.

जोपर्यंत तुम्ही मनावर चांगला ताबा मिळवू शकत नाही, तोपर्यंत तुमचे राग द्वेष नष्ट होत नाही आणि तुमच्या इंद्रीयांवरही तुम्ही ताबा मिळवू शकत नाही.

परीश्रमातच मनुष्याची माणुसकी आहे.

दोन धर्मामध्ये कधीच संघर्ष होत नाही, सर्व धर्मांचा अधर्माबरोबर संघर्ष होत असतो.

VIEW ALL

Read Next Story