तो पुन्हा आला! एका वर्षानंतर केन विल्यमसनचं टी-ट्वेंटीमध्ये कमबॅक

बांगलादेश विरुद्ध सीरीज मध्ये डेवन कॉनवेला आराम तर अनेक खेळाडू जखमी.

Dec 17,2023


केन विल्यमसनने गुडघ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर विश्वचषकादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.


गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त असलेला न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आता वनडे आणि कसोटीनंतर टी-२०मध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.


बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी त्याला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. जवळपास वर्षभरात तो कोणताही टी-२० सामना खेळला नाही.


सलामीवीर डेव्हॉन कॉनवे याला T20I मधून विश्रांती देण्यात आली आहे, तर मायकेल ब्रेसवेल, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री आणि हेन्री शिपले वेगळ्या दुखापतींमुळे निवडीसाठी अनुपलब्ध होते.


ट्रेंट बोल्टने या सिरीजमध्ये खेळणार नसल्याच त्यांनी स्वताहून माहिती दिली.


यंदाच्या आयपीएलच्या पहिल्या सामन्यादरम्यान केनच्या पायाला दुखापत झाली आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली.


ऑलराउंडर जिमी निश्मचेही T20I संघात पुनरागमन झाले आहे, तर वेगवान गोलंदाज बेन सियर्सचा संघात समावेश करण्यात आला आहे.


आम्ही टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी तयारी करत आहोत. टीम सेफर्ट हे आमच्यासाठी ते नाव आहे जो टी-20 विश्वचषकादरम्यान महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असं कोच गैरी स्टीड म्हणाले.

VIEW ALL

Read Next Story