IPL 2024 : 'या' 3 कारणामुळे हार्दिक पांड्या आणि गुजरात टायटन्सची सुटली साथ

अवघ्या दोन वर्षात हार्दिक पांड्या आणि गुजरात टायटन्सची साथ तुटली आहे. IPL 2024 मध्ये हार्दिक पांड्या गुजरात नाही तर मुंबई इंडियन्समधून खेळताना दिसणार आहे.

याबद्दलच्या सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या आहेत मात्र अजून अधिकृत घोषणा झाली नाही. त्यामुळे क्रिकेटप्रेमी या घोषणेच्या प्रतीक्षेत आहेत.

रिपोर्टनुसार, IPL 2023 संपल्यानंतर हार्दिक आणि गुजरात टीम मॅनेजमेंटमध्ये मतभेद खूप प्रमाणात वाढल्याचं बोलं जातं आहे.

हार्दिका स्वत:च्या इच्छेनुसार खेळ करण्याचे स्वातंत्र्य होतं मात्र त्याची वृत्तीही संघ व्यवस्थापनाच्या विचारसरणीशी जुळत नसल्याचं सूत्रांची माहिती आहे.

गुजरात टायटन्स संघाचे प्रशिक्षक आशिष नेहराला आणि हार्दिक यांचं आयपीएल 2023 नंतर मतभेद झाल्याची चर्चा आहे.

हार्दिक पांड्या जगातील सर्वात्तम अष्टपैलू खेळाडूंमधील एक असला तरी त्याची खराब फिटनेस टेन्सशचं कारण आहे. पाठीच्या दुखापतीमुळे बऱ्याच दिवसांपासून गोलंदाजीपासून दूर होता.

VIEW ALL

Read Next Story