हिवाळ्यात फ्लॉवर खाण्याचे फायदे ऐकून थक्क व्हाल!

हिवाळ्यात फ्लॉवर खाण्याचा सल्ला दिला जातो. पण आरोग्यासाठी खरंच फ्लॉवरची भाजी फायदेशीर आहे का?

फ्लॉवरमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, प्रोटीन,कार्बोहायड्रेट, आयरन, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फोरस हे गुणधर्म असतात. जे शरीरासाठी फायदेशीर ठरतात.

फ्लॉवरमध्ये व्हिटॅमिन सीदेखील आढळते ज्यामुळं शरीरात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते.

फ्लॉवरमध्ये फ्लेवोनॉइड आढळते. ज्यामुळं शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होण्यापासून रोखते. तसंच, हृदयासंबधीत आजार कमी करण्यास मदत करते.

फ्लॉवरमध्ये असलेल्या फायबरमुळं तुमची पाचनक्रिया सुरळीत राहते. याचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

व्हिटॅमिन सीमुळं सर्दी-खोकला सारख्या व्हायरल आजार होण्यास प्रतिबंध करते.

फ्लॉवरचे सेवन केल्यास कोलेजनची मात्रा वाढवण्यास मदत होते ज्यामुळं त्वचेचे आरोग्य सुधारते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story