पनीर प्रोटीनचा चांगला स्रोत असल्याने तुम्ही जास्त प्रमाणात प्रोटीन सेवन केल्यास तुम्हाला डायरियाची समस्या होण्याची भीती आहे.
जर तुम्ही रक्तदाबाचं त्रास असेल तर पनीर सेवन करु नका. जास्त प्रमाणात पनीरचं सेवन केल्यास तुमचं रक्तदाब वाढण्याची भीती असते.
जर तुम्हाला आधीच पचन, बद्धकोष्ठता, अॅसिडिटीशी संबंधित समस्या असतील तर रात्री झोपताना पनीरचे सेवन चुकूनही करु नका. पनीर जास्त प्रमाणात खाल्ल्याने तुम्हाला अॅसिडीटी आणि कधी कधी बद्धकोष्ठतेचा त्रास होण्याची भीती असते.
तुम्हाला कच्चे पनीर खायची आवड असेल तर जास्त प्रमाणात करु नका. नाही तर तुम्हाला इंफेक्शनचा त्रास होऊ शकतो.
ज्या लोकांना फूड पॉइजनिंगची समस्या त्या लोकांनी पनीर खाणं टाळलं पाहिजे.
पनीरमध्ये फॅटचे प्रमाण जास्त असल्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढतं. त्यामुळे तुम्हाला हृदयाशी संबंधित आजाराची समस्या होऊ शकते. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)