टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आयपीएलच्या सतराव्या हंगामात मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करतोय.
आयपीएलच्या यंदाच्या हंगमात मुंबई इंडियन्सची कामगिरी अतिशय निराशाजनक झालीय. सलग तीन सामन्यात मुंबईला पराभव पत्करावा लागला आहे.
1 एप्रिलला झालेल्या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना छोटा ब्रेक मिळाला आहे. या ब्रेकदरम्यान हार्दिक पांड्या सोमनाथ मंदिरात पोहोचला.
हार्दिक पांड्याने महादेवाचं मनोभावे दर्शन घेतलं. त्यानंतर त्याने महादेवची पूजा आणि जलाभिषेक केला.
सोमेश्वर महापूजन शिवाय सोमनाथ मंदिरात त्याने ध्वज पूजनही केलं.
श्री सोमनाथ ट्रस्टचे महाप्रबंधक विजयसिंह चावडा यांनी हार्दिक पांज्याला महादेवाचं स्मृती चित्र आणि प्रसाद भेट दिला.
सोमनाथ मंदिर गुजरातच्या प्रभास पाटनमध्ये आहेत. या भागाला देव पाटनही म्हटलं जातं. शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे पहिलं ज्योतिर्लिग आहे.