उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणून अश्विनी कासारला ओळखले जाते.

तिने नाटकातून मनोरंजन विश्वात पदार्पण केले. त्यानंतर अश्विनीने कमला या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण केले.

त्यानंतर ती 'सावित्रीजोती', 'सुख म्हणजे नक्की काय असतं' अशा अनेक मालिकांमध्ये झळकली.

सध्या अश्विनी ही सोनी मराठीवरील 'कारण.. गुन्ह्याला माफी नाही..' या मालिकेत पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकत आहे.

आता नुकतंच अश्विनीने दाक्षिणात्य लूकमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे.

यावेळी तिने पांढऱ्या रंगाची सोनेरी बॉर्डर असलेली साडी परिधान केली होती.

त्यासोबतच तिने केशरी रंगाचा हटके ब्लाऊज आणि या लूकला साजेसे दागिनेही घातले होते.

यात अश्विनी हुबेहुब दाक्षिणात्य लोकांप्रमाणे दिसत आहे.

सध्या तिचे हे दाक्षिणात्य लूकमधील फोटोशूट इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.

VIEW ALL

Read Next Story