महिलांमध्ये वयाच्या प्रत्येक टप्प्यावर शारीरिक बदल पाहायला मिळतात. पण चाळीशीतील वय थोडे खास आहे.
चाळीशी पार केल्यानंतर महिलांमध्ये कोणते बदल दिसतात, हे जाणून घेऊया.
चाळीशीनंतर ज्या महिलांची शारीरिक हालचाल कमी होते, त्यांच्यामध्ये वजन वाढीची समस्या जाणवते.
चाळीशीनंतर महिलांच्या शरिरात एस्ट्रॉजनची कमी जाणवते.यामुळे फेशियल हेअर आलेले दिसतात.
चाळीशीनंतर महिलांची हाडे कमजोर होऊ लागतात. ज्यामुळे गाठीया सारख्या समस्या उद्भवतात.
हॉट फ्लॅश या आजारामध्ये महिलांना अचानक गरम वाटू लागते आणि घामदेखील लवकर येतो.
वाढत्या वयासोबत युरिन पास करण्यास मदत करणाऱ्या नसा कमजोर होतात.ज्यामुळे युरिन इन्फेक्शनचा धोका जाणवतो.