धोनी नाही तर 'हा' खेळाडू होता कर्णधार म्हणून CSK ची पहिली चॉइस

5 जेतेपदं मिळवून दिली

महेंद्रसिंह धोनी हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. धोनीने चेन्नई सुपर किंग्सला आतापर्यंत 5 जेतेपदं मिळवून दिली आहेत.

धोनीचं शेवटचं पर्व?

यंदाचं म्हणजेच 2024 चं आयपीएलचं पर्व हे धोनीचं शेवटचं पर्व असेल अशी जोरदार चर्चा आहे.

विजयाची सरासरीही 50 टक्क्यांहून अधिक

धोनीची विजयाची सरासरीही 50 टक्क्यांहून अधिक आहे. 226 सामन्यांमध्ये चेन्नईचं नेतृत्व करताना धोनीनं 133 सामने जिंकले आहेत.

2008 च्या पर्वापासून 2023 च्या पर्वापर्यंत नेतृत्व

धोनीने चेन्नईच्या संघाचं नेतृत्व अगदी पहिल्या म्हणजेच 2008 च्या पर्वापासून 2023 च्या पर्वापर्यंत केलं आहे. 2016 आणि 2017 मध्ये चेन्नईच्या संघावर बंदी घालण्यात आलेली.

दोन चॅम्पियन्स लीगही जिंकल्या

केवळ आयपीएल नाही तर धोनीने क्रिकेट चॅम्पियन्स लीग टी-20 मध्येही चेन्नईचं नेतृत्व केलं. चेन्नईने सीएलटी-20 स्पर्धा 2 वेळा जिंकली.

धोनी पहिला चॉइस नव्हता

मात्र आज धोनी म्हणजे सीएसके असं समीकरण असताना 2008 मध्ये धोनी हा चेन्नईची पहिली चॉइस नव्हता. तुम्हाला हे वाचून धक्का बसला असला तरी हे खरं आहे.

धोनी ऐवजी कोणाचा विचार करत होता चेन्नईचा संघ

धोनीचा कर्णधार म्हणून विचार करण्याआधी चेन्नईचा संघ विरेंद्र सेहवागचा विचार कर्णधार म्हणून करत होते.

2021 मध्ये करण्यात आला खुलासा

2021 मध्ये चेन्नईचा माजी क्रिकेटपटू एस. बद्रीनाथने त्याच्या युट्यूब चॅनेलवर यासंदर्भात खुलासा करताना धोनी हा चेन्नईची पहिली पसंती नव्हता तर सेहवागला त्यांची पसंती होती.

मात्र सेहवागने हा निर्णय घेतला

मात्र सेहवागने त्याची क्रिकेट कारकिर्द दिल्लीत घडवल्याने तो लिलावामधून बाहेर पडला आणि त्याने दिल्ली डेअरडेव्हर्सकडून लढण्याचं ठरवलं.

चेन्नईने लावलेला डाव जॅकपॉट

सेहवाग लिलावातून बाहेर पडल्याने चेन्नईने धोनीवर डाव लावला आणि धोनीची निवड चेन्नईसाठी लकी ठरली.

भारताला पहिलाच टी-20 वर्ल्डकप जिंकवून दिला

धोनीने 2007 साली झालेल्या पहिल्या टी-20 वर्ल्डकपचं जेतेपद भारताला मिळवून दिल्याने सर्वच संघांकडून त्याला जोरदार मागणी होती.

मुंबईने लावला जोर

धोनीला आपल्या संघात घेण्यासाठी मुंबई इंडियन्सची धडपड सुरु होती. मुंबईने धोनीला विकत घेण्यासाठी बराच जोर लावला. मात्र लिलावात शेवटी विजय चेन्नईचा झाला.

VIEW ALL

Read Next Story