इंडियन प्रीमिअर लीग 2024 स्पर्धेला आता तीन दिवसांचा अवधी उरलाय. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरमध्ये रंगणार आहे.

या सामन्यात मोठ्या कालावधीनंतर विराट कोहली आणि एमएस धोनी आमने सामने येणार आहेत. दोघांच्या चाहत्यांमध्येही कमालीची उत्कुसता आहे.

त्याआधी चाहत्यांना एक सरप्राईज मिळालय.आयपीएल आधी विराट कोहली नव्या लूकमध्ये समोर आलाय.

विराटचा नवा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीत पडलाय. प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट आलिम हाकिम यांनी विराटचा हेअरकट केलाय.

विराटच्या हेअरकटबरोबरच त्याची आयब्रो पाहून चाहते हैराण झालेत. विराट कोहलीने आयब्रोला कट दिलीय. काही दिवसांपूर्वी धोनीने अशीच हेअरस्टाईल केली होती

विराट कोहली 15 फेब्रुवारीरोजी दुसऱ्यांदा बाबा झाला. या कारणाने इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यातूनही त्याने माघार घेतली होती.

सध्या विराट कोहली आयपीएलसाठी सज्ज झालाय. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाच्या सराव शिबिरात विराट दाखल झालाय.

VIEW ALL

Read Next Story