आयपीएलमध्ये पहिल्या चेंडूवर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आहे.

मोहम्मद शमीने आपल्या आयपीएल काररकिर्दीत तीनवेळा पहिल्या चेंडूवर विकेट घेण्याचा कारनामा केला आहे.

या यादीत मुंबई इंडियन्सचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा दुसऱ्या क्रमांकावर आहे. मलिंगाने दोन वेळा पहिल्या चेंडूवर विकेट घेतल्या आहेत.

मुंबई इंडियन्सचाच ट्रेंट बोल्ट या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. बोल्टने दोन वेळा पहिल्या चेंडूवर विकेट घेण्याची कामगिरी केलीय.

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारनेही आयपीएल कारकिर्दीत दोन वेळा पहिल्या चेंडूवर विकेट घेतल्य आहेत.

टीम इंडियाचाच वेगवान गोलंदाज उमेदश यादवचाही या यादीत समावेश आहे. उमेश यादवनेही आयपीएलमध्ये दोन वेळा पहिल्या चेंडूवर विकेट घेतल्या आहेत.

स्टार गोलंदाज मोहम्मद शमी आयपीएल 2024 मधून बाहेर पडला आहे. लंडनमध्ये नुकतीच त्याच्या पायावर शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे यावेळी विकेट घेण्याची संधी तो हुकणार आहे.

VIEW ALL

Read Next Story