आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सने तीनपैकी दोन सामन्यात विवजय मिळवलाय. पॉईंटटेबलमध्ये चेन्नई तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Apr 03,2024


चौथ्या सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का बसला आहे. चेन्नईचा प्रमुख वेगवान गोलंदाज बाहेर होण्याची शक्यता आहे.


क्रिकबजच्या रिपोर्टनुसार बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला आयपीएलच्या पुढच्या सामन्यााल मुकावं लागण्याची शक्यता आहे


एमएस धोनीऐवजी ऋतुराज गायकवडाच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सचा पुढचा सामना 5 एप्रिलला सनरायजर्स हैदराबादशी रंगणार आहे.


टी20 वर्ल्ड कपसाठी अमेरिकेचा व्हिजा मिळवण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. यासाठी मुस्तफिजून रहमान बांगलादेशला रवाना झालाय.


यंदाच्या आयपीएलमध्ये रहमान आतापर्यंतच्या सामन्यात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. रहमानने 3 सामन्यात 7 विकेट घेतल्या आहेत.


रॉयल चॅलेंजर्सविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात मुस्तफिजून रहमानने 4 षटकात 29 धावा देत 4 विकेट घेतल्या होत्या. सध्या पर्पल कॅप रहमानकडेच आहे.

VIEW ALL

Read Next Story