चेन्नई सुपर किंग्सला प्ले ऑफची संधी असतानाच एक मोठा धक्का बसला आहे. चेन्नईचा प्रमुख गोलंदाज मुस्तफिजुर रहमान संघातून बाहेर होणार आहे.

Apr 16,2024


मुस्तफिजूर रहमान 1 मेपर्यंतच चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळणार आहे. त्यानंतर तो संघासाठी खेळू शकणार नाही.


बांगलादेश क्रिकेट बोर्डाने रहमानची एनओसी एक दिवसासाठी वाढवली आहे. म्हणजे मुस्तफिजूर रहमान पंजाब किंस्गविरुद्धच्या सामना खेळू शकणार आहे.


चेन्नई 19, 23 एप्रिलला लखनऊ सुपर जायंट्स, 28 एप्रिलला सनरायजर्स हैदराबद आणि 1 मे रोजी पंजाबविरुद्ध सामना खेळणार आहे.


पण यानंतर मुस्तफिजूर रहमान मायदेशी रवाना होईल. 3 मेपासून 12 मे पर्यंत झिम्ब्बाबेविरुद्ध T20I मालिका खेळवली जाणार आहे, यासाठी रहमान संघात आहे.


मुस्तफिजूर रहमानची यंदाच्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी राहिलीय. पहिल्याच सामन्यात रहमानने 29 धावात चार विकेट घेतल्या होत्या.


चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत खेळलेल्या पाच सामन्यात मुस्तफिजूर रहमानने 10 विकेट घेतल्या आहेत. चेन्नईच्या विजयात त्याची भूमिका महत्त्वाची ठरलीय.

VIEW ALL

Read Next Story