विजेता संघाला म्हणजेच चेन्नई सुपर किंग्जला 20 कोटी मिळाले आहेत.
उपविजेता संघाला म्हणजेच गुजरात टायटन्स संघाला 13 कोटी मिळाले आहेत.
तिसऱ्या क्रमांकावरील संघ म्हणजेच मुंबई इंडियन्सला (MI) 7 कोटी रुपये मिळाले.
चौथ्या क्रमांकावरील संघ म्हणजे लखनऊ सुपर जायनट्स (LSG) संघाला 6.5 कोटी मिळतील.
पर्पल कॅप विजेता खेळाडू मोहम्मद शमी याला 15 लाख रुपये मिळाले.
ऑरेंज कॅप विजेता ठरलेल्या शुभमन गिल याला 15 लाख रुपये दिले गेले.
सुपर स्ट्राईकर ठरलेल्या ग्लेन मॅक्सवेलला देखील 15 लाख रुपये मिळाले आहेत.
मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर म्हणून शुभमन गिल याचं नाव समोर आलंय. त्याला 12 लाख मिळाले आहेत.
गेम चेंजर ठरलाय तो साई सुदर्शन. 12 लाख त्याच्या खात्यावर जमा होणार आहेत.
इमर्जिंग प्लेयर या पुरस्काराचा मानकरी ठरलाय यशस्वी जयस्वाल. त्याला 20 लाख मिळाले आहेत.
कॅच ऑफ द सीजन हा अवॉर्ड राशिद खानला मिळाला आहे. 12 लाख मिळतील.
फायनल सामन्यात सामनावीर ठरलेल्या डेव्हिड कॉन्वे याला 5 लाख रुपयाचं बक्षीस असणार आहे.