शुटिंग संपल्यानंतर कपड्यांचं काय?

बॉलिवूड अभिनेते-अभिनेत्री चित्रपटांमध्ये करोडोंचे कपडे घालतात. मग ती देवदासमधील ऐश्वर्या-माधुरीची साडी असो किंवा बाजीराव मस्तानीमधील रणवीर, दिपिकाचे कपडे असोत.

अभिनेत्यांनी वापरलेल्या कपड्यांचं नंतर काय होतं?

या कपड्यांची किंमत लाखो, करोडोंमध्ये असते. पण चित्रपटाचं शुटिंग संपल्यानंतर या कपड्यांचं काय होतं असा प्रश्न अनेकदा लोकांच्या मनात येत असतो. तर मग जाणून घ्या...

पुन्हा होतो वापर

फॅशन स्टायलिश अक्षय त्यागी यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, फिल्म स्टार्सकडून घातले जाणारे हे कपडे नंतर पॅक करुन ठेवले जातात. नंतर नव्या अंदाजात त्यांना वेगळ्या ठिकाणी वापरले जातात.

ऐश्वर्या रायचा 'कजरा रे'मधील ड्रेस

'कजरा रे' ऐश्वर्या रायने घातलेल्या ड्रेसमध्ये नंतर बदल करत 'बँड बाजा बारात' चित्रपटातील एका डान्सरसाठी वापरण्यात आला होता.

काही स्टार्स घरी घेऊन जातात

अक्षय त्यागी सांगतात की, अनेकदा स्टार्सना एखादा ड्रेस जो त्यांना आवडतो किंवा पर्सनॅलिटीशी जुळतो तो ते घरी घेऊन जातता.

दिपिकाने चष्मा घरी नेला होता

'ये जवानी है दिवानी' चित्रपटात दिपिकाने चष्मा आवडल्याने तो घरी नेला होता.

कपड्यांचा लिलावही होतो

स्टार्सकडून वापरले जाणारे कपड्यांचा अनेकदा लिलावही केला जातो.

सलमानच्या टॉवेलचा 1 लाख 42 हजारात लिलाव

उदाहरण द्यायचं झाल्यास, 'जिने के है चार दिन' गाण्यात सलमानने वापरलेला टॉवेल 1 लाख 42 हजारात लिलावत विकण्यात आला होता. हे पैसे नंतर चॅरिटीत देण्यात आले होते.

'रोबोट' चित्रपटातील कपडेही विकले

'रोबोट' चित्रपटात रजनीकांत आणि ऐश्वर्याने घातलेले कपडेही महाग होते. या कपड्यांचा लिलाव करत विकण्यात आलं होतं.

VIEW ALL

Read Next Story