भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे.
या फोटोंमध्ये ती हसताना दिसत आहे.
हसणे नाही, हसण्याचं कारण बदललंय, अशी छानशी कॅप्शन त्यावर लिहिली आहे.
यामुळे सानियाच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोंडीबद्दल पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत.
सानिया मिर्झा आणि शोएब अख्तर यांनी 2010 मध्ये लग्न केले होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या दोघांमधील घटस्फोटाच्या चर्चा येत ऐकू येत आहेत.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिकने अलीकडेच त्याच्या सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम अकाउंटचा बायो बदलला आहे.
"@mirzasanar सुपरवुमन चा पती, एक पिता' असे त्याच्या इंस्टाग्राम बायोमध्ये सुरुवातीपासून होते. पण आता शोएबने त्याचा इंस्टाग्राम बायो बदलला आहे.
आता त्याने फक्त "एक पिता" असेच बायोमध्ये ठेवले असून सानियाचे नाव बायोमधून काढून टाकले आहे. त्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
सानिया आणि शोएब यांनी यावर प्रतिक्रिया देणे टाळले आहे.