हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ असूनही आजही क्रिकेटला जास्त प्राधान्य देण्यात येतं हे वारंवार दिसून आलंय. वर्ल्ड जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघावर पैशांचा पाऊस पडला.
पण आजही राष्ट्रीय खेळ असणाऱ्या हॉकी खेळाडूंकडे दुर्लक्ष होत असल्याचा प्रश्न उपस्थितीत होतो.
हॉकीपटूंचं उत्पन्न हे क्रिकेटपटूंएवढं नाही, हॉकी इंडिया ही खेळाडूंना पगारही देत नाही. मग हे खेळाडू आपलं खर्च आणि घर कसं चालवतात.
तर आम्ही तुम्हाला सांगतो, हॉकीपटू जेव्हा एखादी टूर्नामेंट जिंकतो. त्यातून मिळणारं रक्कम ही खेळाडूंमध्ये वाटण्यात येते.
याशिवाय हॉकी संघात खेळणारे सर्व खेळाडू कोणत्या ना कोणत्या सरकारी नोकरीत काम करतात. तो त्यांचा खरा पगार असतो. हॉकीमधून त्यांना फार काही मिळत नाही.
2022 मध्ये हॉकी इंडियाने प्रत्येक सामना जिंकल्यानंतर संघातील प्रत्येक खेळाडूंना 50,000 देण्याची घोषणा केली होती.