रिया चक्रवर्ती आता कपडे विकणार, 'हे' असणार ब्रँडचं नाव

अभिनेत्री रिया चक्रवर्तीने नुकतेच पॉडकास्ट 'Chapter 2' सुरु केलं आहे.

पॉडकास्टमध्ये तिने म्हटलं आहे की, तिला फॅशन आणि कपड्यांमध्ये खूप रस आहे.

सुष्मिता सेनसोबतच्या एका पॉडकास्टमध्ये तिने सांगितले होते की ती एक नवीन प्रवास सुरु करणार आहे.

रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीसोबत कपड्यांच्या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

मंगळवारी रिया चक्रवर्तीने तिच्या कपड्यांच्या ब्रँड 'Chapter 2' ची घोषणा केली आहे.

रियाने शोविकसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघांनीही त्यांच्या ब्रँडचे टी-शर्ट घातले आहेत.

रियाला सुशांत सिंग मृत्यू प्रकरणात अडकली होती. तिला या प्रकरणात तुरुंगात देखील जावे लागले होते. मात्र, नंतर तिला जामीन मिळाला.

VIEW ALL

Read Next Story