आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या ग्रंथात अनेक महत्त्वाचे उपदेश दिले आहेत. जे आयुष्यातील कठिण काळात आपल्यासाठी फायदेशीर ठरतात
लोकांना पारखून घेण्यासाठी चाणक्य नितीतील श्लोक खूप उपयुक्त ठरतात.
चाणक्य नितीत एक श्लोक आहे, आतुरे व्यसने प्राप्ते दुर्भिक्षे शत्रु-संकटे, राजद्वारे श्मशाने च यस्तिष्ठति स बान्धवः
याचा अर्थ हा आहे की, रोगाने ग्रासल्यावर, दुखी झाल्यावर, दुष्काळ पडल्यावर, संकट आल्यावर किंवा मृत्यू आल्यावरही जो व्यक्ती साथ सोडत नाही तो सच्चा दोस्त असतो
कठिण परिस्थितीत जो आपल्यासोबत उभा राहतो तोच व्यक्ती आपला असतो.
मदतीची वा कोणतीही दुसरी अपेक्षा न ठेवता जो व्यक्ती तुमच्यासाठी पुढे येईल तो खरा मित्र असतो.
तसंच, तुमच्या ओळखीत एखाद्यावर संकट कोसळलं तर तर तुम्हीही लगेचच त्याच्यासाठी धावून जायला हवं
जो व्यक्ती फक्त स्वतःचा विचार करतो त्याच्यावर संकट आल्यानंतर त्याची मदत कोणीच करत नाही
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)