भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज ईशांत शर्माचं योगदान फार मोठं आहे. अनेक मोक्याच्या क्षणी त्याने संघाला विजय मिळवून दिला आहे.
ईशांत शर्माचा जन्म दिल्लीत 2 सप्टेंबर 1988 रोजी झाला.
ईशांत शर्मा अभ्यासात फार हुशार नव्हता. दरम्यान, 2007 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
ईशांत शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये 311, एकदिवसीयमध्ये 115 आणि टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 8 विकेट्स घेतल्या आहेत.
ईशांत शर्माला त्याचे मित्र आणि कुटुंबीय प्रेमाने सोनू म्हणून हाक मारतात.
रिपोर्ट्सनुसार, ईशांत शर्माची एकूण संपत्ती 125 कोटी इतकी आहे.
ईशांत शर्मा क्रिकेटमधील त्याच्या योगदानासाठी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
ईशांतचं दिल्ली आणि गुरुग्राम येथे घरं आहेत. याशिवाय त्याच्याकडे अनेक लक्झऱी गाड्या आहेत.
ईशांत शर्माने ताशी 152.2 किमी वेगानेही चेंडू फेकला आहे.