'बॉर्डर'मधून काढलेला 'तो' सीन; किस्सा सांगताना सनी देओल रडू लागला

'गदर-2'च्या यशामुळे चर्चेत

अभिनेता सनी देओल सध्या 'गदर-2'च्या यशामुळे चांगलाच चर्चेत आहे.

अनेकदा तो भावूक झाल्याचं दिसलं

सनी देओलला अनेकदा त्याच्या चाहत्यांनी भावूक झाल्याचं पाहिलं आहे. तो बऱ्याचा सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही भावूक झाला आहे.

'बॉर्डर'बद्दल बोलताना भावूक

मात्र हल्लीच सनी देओल कारगिल युद्धावर आधारित 'बॉर्डर' चित्रपटाबद्दल बोलताना भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

सनी देओलने मुलाखत दिली

यूट्यूबर रणवीर अलाहबादियाच्या पॉडकास्टमध्ये सनी देओलने मुलाखत दिली. यावेळेस तो 'बॉर्डर'मधील डिलीट केलेल्या सीनबद्दल बोलत होता.

मनात फार आदर अन्...

भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित 'बॉर्डर' चित्रपटाबद्दल बोलताना सनी देओलने शसस्त्र दलांबद्दल आपल्या मनात फार आदर आणि प्रेम आहे असं सनीने सांगितलं.

तो सीन कापण्यात आला

'बॉर्डर'मधील आवडत्या सीनबद्दल विचारलं असता सनीने, "एक सीन होता जो शेवटच्या एडिटींगच्या वेळेस कापण्यात आला. तो फार छान सीन होता. जे.पी. दत्तांच्या वडिलांनी तो लिहिला होता," असं सांगितलं.

मी एका छोट्या मंदिरात असतो

"या सीनमध्ये मी एका छोट्या मंदिरामध्ये आहे. मी मागे वळून पाहतो तेव्हा सर्व उद्धवस्त झालेल्या बंकर्समधून आगीचा प्रकाश बाहेर पडताना दिसतो. असं दाखवलेलं," अशी माहिती सनी देओलने दिली.

मी तिथं जातो अन्...

"मी तिथे जातो आणि पाहतो तर माझ्या तुकडीतील सर्व सैनिक जखमी अवस्थेत पडलेले असतात. मी त्यांच्याशी बोलतो आणि त्यांना विश्वास देतो की मी तुमच्या कुटुंबियांची काळजी घेईल. घराचं तुटलेलं छप्पर नीट करुन देईल. त्यांच्या आईशी बोलेन असं दाखवण्यात आलं होतं," असंही सनी देओलने म्हटलं.

स्वर्गात युद्ध होत नाही

"मी त्यांना सांगतो की तुम्ही आता स्वर्गामध्ये आहात. स्वर्गात कोणतंही युद्ध होत नाही," असं सीनबद्दल बोलताना मुलाख देणाऱ्या सनी देओलचे डोळे पाणावले.

...म्हणून वगळला तो सोन

आपले अश्रू पुसत सनी देओलने हा सीन का काढून टाकला हे सुद्धा सांगितलं. चित्रपटाचा कालावधी वाढत असल्याने चित्रपटाचा वेळ कमी व्हावा म्हणून हा सीन काढण्यात आला, असं सनी देओलने सांगितलं.

'बॉर्डर-2'च्या निर्मितीसंदर्भात चर्चा

याच मुलाखतीमध्ये सनी देओलने 'बॉर्डर-2'च्या निर्मितीसंदर्भात चर्चा सुरु असल्याची माहिती दिली.

...तरच 'बॉर्डर-2'मध्ये काम करणार

मात्र 'बॉर्डर-2'ची कथा चांगली असेल तरच आपण चित्रपट करु असंही सनी दोओलने स्पष्ट केलं.

21 दिवसांमध्ये 480 कोटींची कमाई

सनी देओलच्या 'गदर-2' चित्रपटाने प्रदर्शनानंतर 21 दिवसांमध्ये 480 कोटींची कमाई केलेली आहे.

VIEW ALL

Read Next Story